• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सोनार समाजासाठी ‘संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 1, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, ताज्या बातम्या
सोनार समाजासाठी ‘संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, 1 ऑक्टोबर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात असताना काल मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोनार समाजासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या या बैठकीत राज्यातील सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना –
महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळातर्गंत हे महामंडळ असणार आहे. या महामंडळाचे (उपकंपनी) मुख्यालय मुंबई येथे राहणार असून संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या योजना या उपकंपनीमार्फत राबवण्यात येतील. या उपकंपनीस 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल. तसेच सोळा पदे भरण्यात येतील, असा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय –

  • जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता.३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार
  • कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ, अनुकंपा धोरणही लागू करण्यात येणार
  • ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय
  • ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
  • ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार, १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
  • ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
  • देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.
  • भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
  • रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा
  • राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार, जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार
  • लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता
  • धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन
  • रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत
  • केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार, दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार
  • पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक
  • धारावीतील अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना. धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी
  • सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख
  • अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार
  • जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार
  • राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे 40 हजार होमगार्डना लाभ
  • नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार
  • आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती
  • राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण
  • आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ
  • श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५ करणार
  • अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित
  • बार्टीच्या धरतीवर वनार्टी स्वायत्त संस्था
  • मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत
  • जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय
  • पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार
  • राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे
  • शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही
  • अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर
  • माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला
  • राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.
  • डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ
  • महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा

हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: cabinet meetingcm eknath shindedcm ajit pawardcm devendra fadnavismahayuti governmentmantralaymumbaisant narahari maharaj aarthik vikas mahamandal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

Video | ‘जय श्रीराम’चा उल्लेख; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड चॅम्पियन्स सोबत संवाद साधताना सांगितले श्रद्धेचं महत्व

November 6, 2025
Pachora News : नगरदेवळा येथे अल-खिदमत फाउंडेशनतर्फे प्रथमच सामूहिक विवाह सोहळा संपन्न

Pachora News : नगरदेवळा येथे अल-खिदमत फाउंडेशनतर्फे प्रथमच सामूहिक विवाह सोहळा संपन्न

November 6, 2025
भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; खान्देशात कोणाला मिळाली जबाबदारी

भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; खान्देशात कोणाला मिळाली जबाबदारी

November 6, 2025
प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाची ऊत्साहात सांगता; जळगावकरांचा मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाची ऊत्साहात सांगता; जळगावकरांचा मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

November 6, 2025
Jalgaon News : युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे – अभिनेत्री श्रेया बुगडे

Jalgaon News : युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे – अभिनेत्री श्रेया बुगडे

November 6, 2025
दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल! स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार; महाराष्ट्र ठरले देशात पहिले राज्य

दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल! स्टारलिंक कंपनीशी सामंजस्य करार; महाराष्ट्र ठरले देशात पहिले राज्य

November 6, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page