जळगाव, 29 एप्रिल : नागरिकांना विविध सेवा सुलभ, पारदर्शक व त्वरित मिळाव्यात यासाठी समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) योगेश पाटील यांच्या पुढाकाराने “आपला सहायक” ही सेवा आता WhatsApp वर सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, ही सेवा नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर बनवण्यात आली असून, WhatsApp च्या माध्यमातून विविध शासकीय सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. नागरिक खालील सुविधा सहज घेऊ शकतात.
“आपला सहायक ” सेवा 9423184767 या WhatsApp क्रमांकावर उपलब्ध आहे. ही सेवा 24 तास आणि आठवड्याचे सातही दिवस कार्यरत राहणार असून, नागरिकांच्या कामकाजात गती व पारदर्शकता आणण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.