जळगाव, 21 नोव्हेंबर : जळगाव एमआयडीसी परिसरात ट्रकमधील 61 गॅस सिलेंडर चोरी झाल्याची घटना 15 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने आपले नाव फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद जळगाव) असे सांगितले आणि चोरीची कबुली दिली. त्याने हा प्रकार आपल्या साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्यासह केल्याचेही उघड केले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी भारत पेट्रोलियममधून 342 सिलेंडर भरून ट्रक रात्री पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले असता ट्रक जवळच रस्त्याच्या कडेला उभा आढळला; मात्र त्यातील 61 सिलेंडर गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यावर पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने आपले नाव शेख फिरोज शेख याकुब, रा. नशिराबाद जळगाव) असे सांगितले आणि चोरीची कबुली दिली. त्याने हा प्रकार आपल्या साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक रा उस्मानिया पार्क, जळगाव याच्यासह केल्याचेही उघड केले.
पोलिसांनी आरोपींच्या कबुलीजबाबानुसार तपास वाढवत 1 लाख 22 हजार रुपये किमतीचे 61 सिलेंडर हस्तगत केले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले जवळपास पाच लाख रुपये किमतीचे आयशर वाहनही जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकॉ नितीन ठाकुर, पोकॉ किरण पाटील, पोकों शशिकांत मराठे यांनी केली आहे.






