• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

ग्रामसेवक व सरपंचांनी गावाच्या विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे – मंत्री गुलाबराव पाटील

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 4, 2023
in जळगाव शहर, खान्देश, जळगाव जिल्हा
ग्रामसेवक व सरपंचांनी गावाच्या विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 4 मार्च : ग्रामसेवक हे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून गरजूंना लाभ देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. म्हणून ग्रामसेवक आणि सरपंचांनी कर्तव्य भावनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील नियोजन सभागृहात ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांच्यावतीने आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ व सुजल, समृध्द जळगाव अभियान (डासमुक्त जळगाव) शुभारंभ याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन हे होते. तसेच प्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, संजीव निकम, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन आदी. उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकांची भूमिका मोलाची असते. यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामविकासाच्या योजना आखताना सर्वसामान्य नागरिक नजरेसमोर ठेवून विकास कामे करावी. विकासकामांचा दर्जा चांगला राहील, यावर भर देतानाच गावाचा कारभारही पारदर्शक राहिला पाहिजे. ग्रामसेवकांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. यापुढील काळातही अधिकाधिक चांगल कामे आपल्या हातून घडावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारार्थीची जबाबदारी अधिक वाढल्याचे सांगून आपण करीत असलेल्या कामाचे आपल्याला समाधान वाटले पाहिजेत, असे काम सर्वांच्या हातून घडावे. जळगाव जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ग्रामसेवक आणि तलाठी ही ग्रामीण भागाच्या विकासाची दोन चाके आहेत. ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी, चांगले आरोग्य, शिक्षण, घरे, शौचालय, वीज, गॅस आदि सुविधा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेण्याचे आवाहन केले. स्वच्छतेसाठी गावात शोषखड्डे आवश्यक आहे. त्यानुसार अधिकाधिक प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया म्हणाले, जळगाव जिल्ह्यात 400 गावे हागणदारीमुक्त झाली आहे. आता डासमुक्त जळगाव अभियान पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातील 5 गावात असे एकूण 75 गावात राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, चांगल्या कामातून इतरांना प्रेरणा मिळत असल्याने प्रत्येकाने अधिकाधिक चांगले काम करावे. यापुढे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दरवर्षी वितरीत होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवर.

यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, राज्याध्यक्ष श्री. निकम, पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक अविनाश पाटील, सविता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील सन 2014-15 ते 2016-17 या कालावधीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कारार्थीना शाल, सन्मापत्र, सन्माचिन्ह, साडी व ड्रेसचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या ग्रामसेवकांचा झाला सत्कार

सन 2014-15 मधील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार शितल नथ्यु पाटील, (अमळनेर), विकास भिमराव पाटील, (भडगांव), गणेश तुकाराम सुरवाडकर, (भुसावळ), दिनेश मांगा वळवी, (बोदवड), दिपक मोरेश्वर जोशी, (चोपडा), हरीभाऊ शंकर पाटे, (चाळीसगांव), प्रल्हाद नारायण पाटील, (एरंडोल), प्रतिभा यशवंत पाटील, (जामनेर), रविद्र दत्तात्रय चौधरी, (पाचोरा), ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, (पाचोरा), रविंद्र कडू नागरुद, (मुक्ताईनगर), देविदास धनराज पाटील, (रावेर), सुनिल नामदेव फिरके, (यावल)

सन 2015-16 साठीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार कविता नवल साळुंखे, (अमळनेर), भिला काशिनाथ बोरसे, (भडगांव), गोंविद हिरासिंग राठोड, (भुसावळ), पंढरीनाथ तुकाराम झोपे, (बोदवड), नंदकिशोर भालचंद्र सोनवणे, (चोपडा), दिलीप सोमा अहिरे, (चाळीसगांव), नारायण सजन माळी, (एरंडोल), संदिप पांडुरंग महाजन, (धरणगाव), रुपाली मधुकर साळुंखे, (जळगाव), भास्कर पुंडलिक महाजन, (जामनेर), अविनाश देविदास पाटील, (पाचोरा), नरेंद्र साहेबराव सांळूखे, (पारोळा), मनोहर नारायण चौधरी, (मुक्ताईनगर), कुंदन उत्तम कुमावत, (रावेर), संजिव सुरेश चौधरी, (यावल)

सन 2016-17 साठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राजेश नामदेव पाटील (अमळनेर), शरद शांताराम पाटील (भडगांव), पंकज अरुण चौधरी (भुसावळ), चिंतामण रणजीत राठोड (बोदवड), मधुकर लोटन चौधरी (चोपडा), सविता रंगनाथ पांडे (चाळीसगांव), रमेश मधुकर पवार (एरंडोल), अनिल भास्कर पाटील (धरणगांव), उल्हासराव प्रकाशराव जाधव (जळगांव), गोंविदा नामदेव काळे (जामनेर), स्वाती दामोदर पाटील (पाचोरा), प्रिती प्रल्हाद जढाल (मुक्ताईनगर), रुबाब महोम्मद तडवी (यावल) यांना देण्यात आला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gramsevak puraskar sohla jalgaongulabrao patilgulabrao patil in jalgaongulabrao patil newsjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

March 6, 2026
‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

March 6, 2026
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
VIDEO | राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मुद्दा उपस्थित

VIDEO | राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मुद्दा उपस्थित

March 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page