जळगाव, 22 जुलै : हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे 41 पैकी 4 गेट 0.5 मी. उंचीने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 4238 cusecs इतका विसर्ग सुरू आहे.
नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी –
पुढील काही तासांत 15,000 ते 20,000 cusecs पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.
जळगावाचा हवामान अंदाज –
जळगावातील काही भागात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात उद्या आणि परवा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसेच उद्या ढगाळ वातावरण राहणार असल्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : महावितरणच्या तारा चोरी प्रकरणी ताबडतोब गुन्हे नोंदवा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले महत्वाचे आदेश