ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कंत्राटी भरतीविरोधात आंदोलन सुरू होती तसेच राज्यसरकारचा या आंदोलनांद्वारे निषेध करण्यात येत होता. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत, कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केला. यावरून आज पाचोऱ्यात भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.
भाजपच्यावतीने निषेध आंदोलन –
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारिषदेत कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करताना त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले होते. दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कंत्राटी भरती संदर्भात राज्यातील लाखो तरुणांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात छ. शिवाजी महाराज चौकातमहाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारत माफी मांगोच्या जोरदार घोषणा दिल्या.
यांची होती उपस्थिती –
राज्यातील तरूणांची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांच्यावतीने आनंद व्यक्त करत घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, ज्योतीताई चौधरी, कांतीलाल जैन, बन्सीलाल पाटील, रमेश वाणी, सुनील पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, दीपक माने, समाधान मुळे, जगदीश पाटील, शरद पाटील, योगेश माळी, राहुल गायकवाड, भैया ठाकूर, वीरेंद्र चौधरी, रिंकू जैन, बाळू धुमाळ, रमेश शामनानी, टिपू देशमुख, रहीम बागवान, विनोद पवार, शहाजी बावचे, रामा जठार, हेमंत पाटील, आकाश लांडगे, नकुल पाटील, बबलू मराठे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.