• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांसाठी मोठा सोहळा! जैन हिल्सवर कृषी महोत्सवाची उत्साहात सुरूवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 15, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी मोठा सोहळा! जैन हिल्सवर कृषी महोत्सवाची उत्साहात सुरूवात

जळगाव, 15 डिसेंबर : जैन हिल्सवर कृषी महोत्सवाची उत्साहात सुरूवात झाली असून 14 डिसेंबर ते 14 जानेवारी 2025 पर्यंत या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

महोत्सवाची संकल्पना नेमकी काय? –
शेतीच्या क्षेत्रातील अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान विविध पिकांच्या डेमो प्लॉटच्या माध्यमातून जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी केली आहेत. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाधारित शेतीची कास धरली तरच चैतन्याचे व भरघोस उत्पन्नाचे मोठे संचित शेतकऱ्यांच्या हाती लागेल हे त्रिवार सत्य आहे. या महोत्सवाची आधुनिक तंत्रज्ञान आणि नवचैतन्य ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे. 14 जानेवारी 2025 पर्यंत होणाऱ्या या महोत्सवाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या ‘संजीवन दिन’ निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिक्स इन वन ह्या संकल्पनेत ऊसाची शेती, कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेले क्षेत्र याचा समावेश आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्या जात आहेत. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, आले, लसूण यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता व अनुभवता येणार आहे.

कृषी महोत्सवात 12 बैलगाड्यांची संकल्पना –
आधुनिक काळात शेतीमध्ये बैल गाडी ही संकल्पना पुसट होत चालली आहे. ग्रामीण संस्कृतिचे जतन व्हावे आणि एक चांगला संदेश जावा यासाठी या महोत्सवात 12 बैल गाड्यांची संकल्पना उभारण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात यात्रा किंवा विशिष्ट तिथीला 12 गाड्या एकमेकांना बांधून एखादी व्यक्ती त्या ओढत असते. त्या बैलगाडीवर गावातील लोक बसलेले असतात.

याच संकल्पनेच्या धरतीवर आधुनिक शेतीच्या तंत्राची, ठिबक सिंचन, पाईप, पाईप फिटींग, फिल्टर्स इत्यादी बाबी, तंत्रज्ञान अशी जैन इरिगेशनची उत्पादने या गाड्यांवर पहायला मिळतील. सेल्फीसाठी “जैन हायटेक एक्स्प्रेस” कृषी रेल्वेची कलाकृतीही जैन इरिगेशनच्या कला विभागातील आर्टिस्टद्वारा उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ही जैन हायटेक फार्मिंग एक्स्प्रेस कृषी क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याचं प्रतीकच आहे.

पूर्व नोंदणी आवश्यक –
जैन हिल्स येथे या महोत्सवानिमित्त लागवड केलेले पिके त्यांचे माहिती फलके, त्या त्या विषयाचे तज्ज्ञ अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सज्ज आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये नव चैतन्य फुलण्यासाठी टिश्युकल्चर, सीड, सिडलींग यांचेही तंत्र एकाच छताखाली पहावयास मिळते. या महोत्सवाला भेट देण्यासाठी पूर्व नोंदणी करावी, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खान्देशपुत्राला मोठी जबाबदारी, कोण आहेत डॉ. रामेश्वर नाईक?

बातमी शेअर करा !
Share
Tags: agricultural festivalagricultural festival 2024jain hillsjalgaon latest newskrishi mahotsav 2024marathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

October 13, 2025
विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

October 13, 2025
तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

October 13, 2025
गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

October 13, 2025
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

October 13, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page