ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 29 जून : पाचोरा- नवीन खरीप हंगाम सुरु झालेला असून संभाव्य नैसर्गिक आपत्तीचे धोके पाहता शेतकऱ्यांनी कृषि मालाचा पिक विमा उतरवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शासनाची कृषि पिकांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरु झालेली आहे.
सदर योजनेमार्फत शेतकऱ्यांना पिक विमा उतरवणे सुलभ व्हावे यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा-भडगाव तर्फे मुख्य कार्यालय पाचोरा येथे सन-2024-25 चा खरीप हंगामातील पिकांसाठी पिक विमा भरणा सुविधा केंद्र निशुल्क दरात मागील वर्षी प्रमाणे या वर्षी हि बाजार समिती मार्फत 1 जुलै-2024 पासून सुरु करण्यात येणार आहेत.
पिकविम्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता –
पिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै-2024 पर्यंत आहे. पिक विमा भरण्यासाठी पिक पेरा असलेला 7/12 उतारा, 8अ उतारा, आधार कार्ड, बँक पास बुक झेरॉक्स, स्वयंम घोषणा पत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तरी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने सभापती गणेश भिमराव पाटील व उपसभापती प्रकाश अमृत पाटील, प्रकाश शिवराम तांबे, युसुफ भिकन पटेल, सुनिल युवराज पाटील, लखीचंद प्रकाश पाटील, राहुल रामराव पाटील, शामकांत अशोक पाटील, विजय कडू पाटील, राहुल अशोक संघवी या संचालकांनी केले आहे.
हेही वाचा : ‘दादा का वादा पक्का!’ मुख्यमंत्र्यांनी थेट जीआरच दाखवला, आज अधिवेशनात नेमकं काय घडलं?