ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा (मुंबई), 28 फेब्रुवारी : लोकसभा तसेच काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. दरम्यान, पाचोरा तालुक्यात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांचे समर्थक व शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांचे समर्थक, ठाकरे गट व शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे किशोर पाटील यांनी भाजपचे अमोल शिंदे, शरद पवार गटाला जोरदार धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेत जाहीर प्रवेश –
शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये अमोल शिंदे यांचे समर्थक रितेश आबा पाटील व शरद पवार गटाचे प्रदीप वाघ तसेच प्रदीप पाटील मुकेश पाटील, मुकेश पाटील, गोलू पाटील, चेतन पाटील, तुषार पाटील, आबा पाटील, ललित महाजन, भूषण पाटील, विजय पाटील,विजय पाटील, बंटी पाटील, पप्पू नाना, मुकेश पाटील, नीलेश पाटील, संतोष सोनवणे, रवी सोनवणे, राकेश मिस्तरी, दिनेश महाजन, गणेश पाटील, अप्पा पाटील, रविन्द्र सोनवणे, प्रदीप वाघ, आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यांची होती उपस्थिती –
मुंबईत झालेल्या जाहीर पक्षप्रवेशावेळी पाचोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवरकर, वाहतुक सेनेचे बाळू पाटील, शिवसेना डॉ. प्रमोद पाटील, शिवसेना तालुका समन्वयक दीपक पाटील, प्रणव पाटील, जय बारवकर, अवि पाटील, आदी उपस्थित होते.
हेही वाचा : ‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’, भडगाव येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?