संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा (मुंबई), 26 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. उद्योजक अमृत चौधरी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला.
पारोळा शहरप्रमुखपदी नियुक्ती –
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमृत चौधरी यांनी आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्यांची पारोळा शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँक उपाध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते.
माजी शिवसेना शहरप्रमुख अण्णा नारायण चौधरी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, अण्णा चौधरींची घरवापसी झाल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी याप्रसंगी शिवसेनेचे सचिव संजय मोरे, पुणे लोकसभा निरिक्षक किशोर भोसले, जळगाव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : पतीने पत्नीला जंगलात नेत केली हत्या अन् स्वतःलाही संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना