ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 26 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सन 2024-25 चे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध नृत्य गायन, अभिनय प्रकारात सहभाग नोंदवत आपला कलाविष्कार दाखवला.
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न –
यावेळी विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक दर्जेदार कार्यक्रमाचे सादरीकरण करत उपस्थितांकडून दाद मिळवली. यावेळी पालकांनी बक्षिसांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष अशोक तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी गजानन लादे, बाळू वाघ, गोकुळ वाघ, प्रकाश सकटे, गोकुळ परदेशी, दत्तू पाटील, भगवान पाटील, दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती.
गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या, देशभक्तीपर, राष्ट्रीय एकात्मता आणि विविध मनोरंजन पर गीतांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना जवळपास चार तास खिळवून ठेवत मनोरंजन केले. दरम्यान, प्रेक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन साळुंके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश पाटील, नंदकिशोर कदम, जयश्री निकम, समाधान गोलाईत श्रीराम वानखेडे, प्रशांत पाटील संगीत शिक्षक, विनोद महालपुरे, प्रशांत पाटील, हिम्मत मनगटे, साधना तायडे, ज्ञानेश्वर भिसे, ठाकरे मॅडम, सागर मॅडम, आदींनी परिश्रम घेतले.
हेही पाहा : Buldhana Hairfall: तुमच्या जिल्ह्यातही घडू शकते अशी केसगळतीची घटना?, डॉ. हिम्मतराव बावस्कर Interview