सुनिल माळी, शहर प्रतिनिधी
पारोळा, 3 जानेवारी : पारोळा तालुक्यातील एकमेव एन. इ. एस. गर्ल्स हायस्कूल येथे मुलींच्या नृत्य सादरीकरणातून कलाविष्काराचा स्नेहसंमेलन कार्यक्रम 2 जानेवारी गुरुवार रोजी संपन्न झाला. मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कला सादरीकरणाचा कार्यक्रम दरवर्षी विद्यालयात आयोजित केला जातो. या स्नेहसंमेलनातून आदर्श संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यास मदत होऊन मुलींच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. शैक्षणिक विकासाबरोबर सांस्कृतिक विकास साधला जातो.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपुजन व सावित्रीबाई फूले यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी शाळेत वर्षभरात चालणारे विविध उपक्रमांचे कौतूक केले. कार्यक्रमात 5 वी ते 10 वीच्या 197 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यात पोवाडा, रिमिक्स, लावणी नृत्य सर्वधर्म समभाव, व्यसनमुक्ती, नाटीका, मराठी, हिंदी, अहिराणी भाषेतील गाण्यांच्या चालींवर नृत्य, प्रादेशिक नृत्य प्रकारांचा कलाविष्कार, पथनाट्य असे विविध प्रकारातून भारतीय संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडविले. यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थितांची मने जिंकून, प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलींचे कौतुक केले जात होते.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मिलिंद मिसर हे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष केशव क्षत्रीय, संचालक रोहन मोरे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी, मुख्याध्यापिका नंदिनी मोराणकर, बॉईज हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद अहिरे, पर्यवेक्षक डि. जी. शिनकर, केंद्र प्रमुख संजय पाटील, पत्रकार राकेश शिंदे, योगेश पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला शिक्षिका सरला अमृतकार, सुनिता देसाई, योजना देशमुख, प्रतिभा भोई, सरिता पाटील, रुपाली कोठावदे, स्मृती देशमुख, दर्शना शाह उज्वला मोरे, वैशाली मोरे, सोनाली भामरे यांनी केले तर आभार जाकिर शेख यांनी मानले. यावेळी स्नेहसंमेलन प्रमुख जाकिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर खैरनार, दगडू पवार, सचिन पाटील, धर्मेंद्र शिरोळे, रविंद्र ठाकरे, सुनिल झडप, तिरुमल डूडवे, राजेंद्र पाटील, चंद्रशेखर निकम, संकेत मोरे, संकेत कोळपकर, दिपक पाटील, जयेश भदाणे, प्रशांत पांडे ,भूषण शिरसाठ, कपिल माने अविनाश पाटील, योगेश शेलार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
हेही वाचा : Chopda News : बेकायदेशीर विनापरवाना एक गावठी पिस्तूलसह 2 जिवंत काडतूस आढळले, चोपड्यातून एकाला अटक