ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 3 जानेवारी : शहरातील कृष्णापुरी परिसरातील कै.रघुनाथराव जगताप फाउंडेशन संचलित ग्लोबल नर्सिंग स्कूल एएनएम/जीएनएम ह्या संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच पारंपरिक लोककला, नाट्य, नृत्य तसेच समाजप्रबोधनपर अनेक कार्यक्रम सादर केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय अरुण पाटील, मधुभाऊ काटे, डॉ.जयंत पाटील,रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे कोषाध्यक्ष हृषिकेश पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजमधील विद्यार्थी,विद्यार्थीनी व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.
पहिले वार्षिक स्नेहसंमेलन –
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबई मान्यता प्राप्त तसेच महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परवैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यासोबत संलग्न असलेली ग्लोबल नर्सिंग स्कूल ही संस्था बारावी उत्तीर्ण मुला मुलींना नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे एएनएम तसेच जीएनएम कोर्स चालवते. सदर कॉलेजमध्ये पाचोरा तालुका तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
दरम्यान, यावर्षी कॉलेजचे पहिलेच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहामध्ये साजरे झाले असून स्नेह संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे हे प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा येथील श्रेयेश हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर जयंत पाटील, शिवसेनेचे रवींद्र पाटील, कडे वडगावचे ग्राम पंचायत सदस्य भगवान पाटील, सतिष पाटील, शोभा अक्का पाटील, वरसाडा ग्रामपंचायत सदस्य राठोड, माजी नगरसेवक आर के पाटील, मोमीन तडवी, संदीप कंडारे, डॉ.शीतल होले, मयनाज तडवी, आबा पाटील, समाधान पाटील, गणेश पाटील, निलेश पाटील, पप्पू वाणी, पवन जगताप, अमोल आघम, विद्यार्थी, पालक तसेच कृष्णापुरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive