ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 ऑगस्ट : पाचोरा नगरपरिषदेच्या 16 सफाई कर्मचाऱ्यांचा वारसांना नियुक्तीचे आदेश मिळाले आहेत. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते काल पाचोरा येथील राजीव गांधी टाउन हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रदान कार्यक्रमात आमदार किशोर पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनातील सर्वात सुंदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मला भाग्य लाभले. माझ्या हातून पाचोरा पालिकेतील 16 कर्मचाऱ्यांना व आगामी महिन्याभरात सुमारे 40 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासनाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याची ही फलश्रुती आहे. दरम्यान, राज्यभरातील हजारो वारसहक्क कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळत असल्याने त्याचे आपल्याला मनस्वी समाधान असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
अनुसूचित जाती प्रवर्गातील बांधवांच्या नियुक्तीच्या पाठपुराव्या यापुढील काळात महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये इतर समाजातील जे कर्मचारी साफसफाईचे काम वर्षानुवर्षे करत आले आहेत. त्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत.
– आमदार किशोर पाटील
नियुक्ती मिळवलेल्यांमध्ये यांचा समावेश –
नियुक्ती मिळवलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सेवकराम मोरे, विकास गायकवाड विशाल सोनवणे, रोहित शिरसाट, गायत्री संसारे, उषा कंडारे, आकाश मोरे विद्या आदिवाल, दीपक शेजवळ, गीता कंडारे, पल्लवी जाधव, रवींद्र लहासे, सचिन देहडे, रोहित ब्राह्मणे, संदीप सोनवणे, दीपक खैरे अशा 16 कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देण्यात आले.
16 कर्मचाऱ्यांना नियुक्त पत्र –
लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुरू असलेल्या केसच्या संदर्भात उच्च न्यायालयानेअनुसूचित जाती प्रवर्गातील सफाई कामगारांना नियुक्ती देण्याबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पाचोरा नगर परिषदेने 16 कर्मचाऱ्यांना नियुक्त पत्र देऊन सेवेत सामावून घेतले. यावेळी प्रवीण ब्राह्मणे यांनी मनोगत व्यक्त करत आमदार किशोर पाटील यांचे कर्मचाऱ्यांच्यावतीने आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित सोनार यांनी केले.
यांची होती उपस्थिती –
स्वर्गीय राजीव गांधी टाउन हॉल येथे सोमवारी दुपारी चार वाजता झालेल्या या कार्यक्रमात मंचावर प्रांताधिकारी भूषण अहिरे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, प्रवीण ब्राह्मणे, माजी नगरसेवक सतीश चेडे, बापू हटकर, देवराम लोणारी, हरिभाऊ पाटिल, रवींद्र पाटील, धर्मा वाघ उपमुख्य अधिकारी सोनवणे, डी एस मराठे,विशाल दीक्षित यांची उपस्थिती होती.
हेही वाचा : बापाचं स्वप्न मुलानं पूर्ण केलं! धरणगावचा स्वप्निल बनला PSI; अत्यंत प्रेरणादायी कहाणी