चोपडा, 14 जून : चोपडा तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत वडती/बोरखेडा येथे सुधारित कापूस आदर्श पध्दत प्रकल्प विठ्ठल आफ्रोबीसीआय संस्थेच्यावतीने कृषिमित्र प्रविण सोनवणे यांनी जागतिक बाल मजूर दिवस साजरा करण्यात आला. जागतिक बाल मजूर दिवसाच्या साजरीकरणाबाबत माहिती दिली. प्रशांत चौधरी यांनी देखील बाल मजूर यांचे हक्क विषयी माहिती सांगितले. तसेच सुमित जोशी यांनी कार्यक्रम शेवटी आभार व्यक्त केले.
शाळांमध्ये बालमजूर विरोधात कार्यक्रम आयोजित करून त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच जागतिक बाल मजूर दिवसाच्यानिमित्त सामुदायिक कार्यक्रम आयोजित करून बालमजूरच्या समस्येवर चर्चा केली. तसेच जागरूकता रॅली आयोजित करून बालमजूर विरोधात लढा देण्यासाठी शेतकरी लोकांना प्रेरित करण्यात आली.
ग्रुप ग्रामपंचायत वडती/ बोरखेडा या प्रसंगी संस्थेचे कर्मचाऱ्यांनी बालकांचे हक्क अधिकार व बालकांनी जोखमीची कामे करू नयेत असा संदेश देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना चित्रकला वही व पेन्सिल वाटप करण्यात आली. तसेच गावातील LMRS कमिटी मेंबर यांनी बालमजूर होणार नाही तसेच शासकीय योजना विषयी ग्राम विकास अधिकारी यांनी माहिती दिली जागतिक बाल मजुरी विरोधी दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमास गावातील प्रगतशील शेतकरी, ग्रामस्थ, बचत गट प्रमुख,CRP सदस्य, आशा वर्कर, आदी उपस्थित होते.
प्रदीप गुजराथी व प्रोजेक्ट मॅनेजर संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिमित्र प्रविण सोनवणे व प्रशांत चौधरी व सुमित जोशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.