• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Ban EVM : ईव्हीएम घोटाळ्याचे यंत्र, आगामी निवडणूक मतदान पत्रिकेवर घ्यावी- अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Ban EVM : ईव्हीएम घोटाळ्याचे यंत्र, आगामी निवडणूक मतदान पत्रिकेवर घ्यावी- अ‍ॅड. रमेशभाई खंडागळे

छत्रपती संभाजीनगर, 25 जानेवारी : ईव्हीएम मशिन हे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. यामध्ये हवे तसे घोटाळे करण्याला वाव आहे. जगात भारत सोडून सर्वच देशांनी ईव्हीएमवर बंदी घातली आहे. भारतातही निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीसाठी आगामी निवडणूक मतदान पत्रिकांवर – बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, अशी मागणी भारतीय दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी केली आहे.

भारतीय दलित पँथरच्या वतीने निदर्शने –
भारतीय दलित पँथरच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम बंदी आण बॅलेट पेपेरवर मतदानासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी भारतीय दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. रमेशभाई खंडागळे बोलत होते. यावेळी प्रा. धांडे यांच्यासह महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी –
अॅड. रमेशभाई खंडागळे म्हणाले की, ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळे होतात. ते एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, त्यामुळे त्याला हॅक करणे, किंवा त्यामध्ये छेडछाड करुन घोटाळे करणे शक्य आहे. त्यामुळे ईव्हीएमवर बंदी घालून यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला करण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा द्यावा –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्याची मागणी भारतीय दलित पँथरच्या वतीने करण्यात आली. विद्यापीठाला केंद्रीय दर्जा मिळाला तर शहर हे देशाच्या नकाशावर येईल आणि शिक्षणासंबंधीचे विविध कोर्सेस या शहरात येतील, शहराचा विकास होईल. त्यासोबत मराठवाड्यातील तरुण-तरुणींना शिक्षणासाठी बाहेर राज्यात जाण्याची गरज राहाणार नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन –
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नावाने केंद्रीय विद्यापीठ आहे, त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देऊन, देशात नावलौकीक होईल असे हे विद्यापीठ करण्याची मागणी पँथरने केली. दुष्काळी शेतकऱ्यांना दिलासा, बेघरांना घरे आणि मराठवाड्यात वाढलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात पँथरने आंदोलन करत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ban evmban evm demandbhartiya dalit pantherchhatrapati sambhajinagar news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक तयारीसाठी महत्त्वाचा टप्पा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

February 9, 2026
लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

लाडकी बहिण योजनेसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page