जळगाव, 17 मे : जळगाव जिल्ह्यात असामाजिक तत्वांकडून ड्रोन अथवा मानवरहित हवाई यंत्र (UAV) वापरण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात 16 मेपासून 3 जून 2025 पर्यंत ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 नुसार हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र उडविणे, चालविणे किंवा वापरणे यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल. हा आदेश तातडीच्या परिस्थितीत एकतर्फी (ex parte) पद्धतीने लागू करण्यात आला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : Video : ‘अटक होण्याआधी शिंदेंचा मला फोन’ संजय राऊतांचा दावा, नेमकं काय म्हणाले?