मुंबई, 17 मे : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नरकातरला स्वर्ग पुस्तक लिहित अनेक मोठे गोप्यस्फोट केले आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. दरम्यान, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत अटक होण्याआधी शिंदेंचा मला फोन आल्याचा दावा केलाय. आज सकाळी ते माध्यमांसोबत बोलत होते.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले? –
बाळासाहेबांचे विचार मानले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळ आली नसती, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही कुठे म्हणतोय की नरकात गेलो असं. शिंदेंचा संबंध काय. आदल्या दिवशी अटकेच्या आधी मला शिंदेंचा फोन होतो. अमित शहांसोबत बोलू का असे शिंदे यावेळी मला म्हणाले. मात्र, तुम्ही वर बोललात तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही.
दरम्यान, मला अटक होतेय आणि उद्या मी तुरूगांत जातोय. मी पळून जाणार नाही. यामुळे वर बोलण्याची काही गरज नाही. मी एकटा वर बोलण्यासाठी एकटा समर्थ आहे, असे एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे राऊत म्हणाले.
View this post on Instagram
मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर –
संजय राऊत यांचं पुस्तक बालसाहित्य आहे आणि ते मी वाचत नाही, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, हा बालसाहित्याचा अपमान आहे. बालसाहित्याला साहित्य अकादमी तसेच ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो, हे यांना माहितीये का. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि एवढीच त्यांची लेव्हल आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी पुस्तक वाचावं आणि सत्य स्वीकारवं. जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढताएत. तसे त्यांनी या नरकातला स्वर्ग या पुस्तकातील सत्य स्विकारावं, असे राऊत म्हणाले.
राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज प्रकाशन –
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज सायंकाळी 6 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये प्रकाशन करण्यात येणार आहे. पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती ईडी चौकशीनंतर संजय राऊत यांनी अर्थ रोड कारागृहात शंभर दिवस तुरुंगवास भोगला. यावेळी कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिले आहे. संजय राऊतांनी तुरुंगातील अनुभव यामध्ये मांडले असून अनेक राजकीय दृष्ट्या खळबळजनक दावे या पुस्तकात पाहायला मिळताय.
हेही वाचा : मंत्री गिरीश महाजन यांचं एकनाथ खडसेंना आव्हान; म्हणाले, “तुम्ही फक्त कोथळी…”