भडगाव, 29 सप्टेंबर : भडगाव तालुक्यातील घुसर्डी येथील शेतकऱ्याचे रोटाव्हेटर 19 सप्टेंबर रोजी चोरी झाल्याच्या तक्रारीवरुन भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीसांना सखोल चौकशी करत रोटीव्हीटर चोरीची घटना उघडकीस आणली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? –
घुसर्डी येथील शेतकऱ्याचा रोटाव्हेटर 19 सप्टेंबर रोजी चोरी झालीची घटना घडली होती. याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील संशयीत प्रदिप गोपाल पाटील यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्याचेकडेस रोटाव्हेटर बाबत चौकशी केली.
आरोपींना पोलीस कोठडी –
दरम्यान, त्याचे साथीदार महेश छोटु पाटील रा. निंभोरा, शुभम ऊर्फ गणेश राजेंद्र महाजन, रा. कजगांव, चेतन साहेबराव शितोळे रा. भोरटेक ता. भडगावं यांनी सदरचा रोटाव्हेटर चोरल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. सदर ४ ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असुन न्यायालयाने आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सुमारे १ लाख १० हजार रुपये किंमतीचा रोटाव्हेटर भडगाव पोलीसांनी जप्त केले आहे.
सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.ना नरेंद्र विसपुते, पो.कॉ.सुनिल राजपुत, पो.कॉ .प्रविण परदेशी, पो.कॉ.संदीप सोनवणे यांनी सदरची कारवाई केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ.संजय पाटील हे करत आहेत.