सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत आहेत. यातच आता त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रम्य सकाळचा एक व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे पेपर वाचत असून शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या एक पुस्तक वाचताना दिसत आहेत. तसेच यासोबतच भीमसेन जोशी यांचा अभंगही ऐकताना दिसत आहेत. पाहूयात, याचे फोटो.




