• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Big Breaking! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र; अधिकृतपणे केली युतीची घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Big Breaking! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र; अधिकृतपणे केली युतीची घोषणा

मुंबई, 23 डिसेंबर : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टींची सर्वात जास्त चर्चा होती, अखेर तो क्षण आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र कधी येणार, शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार का, ती कधी होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज महाराष्ट्राला मिळाली आहेत. मुंबईतील वरळी येथील हॉटेल ब्लू सीमध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे.

ठाकरे बंधूच्या युतीची घोषणा –

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज 24 डिसेंबर रोजी दुपारी झाली आहे. राज ठाकरे युतीची घोषणा करताना म्हणाले की, जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू. माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामहून आठवण करून देतो की त्यात मी म्हटलं होतं, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि त्या वाक्यापासून एकत्र येण्याची सुरुवात झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


दरम्यान, कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवण्याच्या टोळ्या फिरत असून आता त्यात दोन जास्त टोळ्या अॅड झाल्या आणि त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात. जे निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार असून अर्ज कधी भरायचे ते देखील कळवली जाईल. दरम्यान, महाराष्ट्राला प्रतिक्षा असलेली घोषणा म्हणजे..शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर घोषणा करत आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.

तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका – उद्धव ठाकरे 

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईकडे-महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा किंवा कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. दरम्यान, भाजपने बटेंगे तो कटेंगे हा जो अपप्रचार केला होता, तसेच मी मराठी माणसाला सांगतो आता जर चुकाल तर संपाल. तसेच आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन –

युतीच्या घोषणेपुर्वी आज सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र मिळून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. यावेळी रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी एकत्र मिळून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे कुटुंबीयांना एकत्र पाहून यावेळी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणावले.

हेही वाचा : गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmumbairaj thackerayshiv sena mns allianceuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

April 8, 2026
नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

April 8, 2026
जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

जळगाव जिल्ह्यातील पोलिस पाटील यांची पार पडली कार्यशाळा; विविध विभागांकडून मार्गदर्शन

April 8, 2026
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा यशस्वीपणे पार; उत्कृष्ट संघटक म्हणून जितेंद्र जैन यांचा ठसा

April 8, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

April 8, 2026
“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

“मतदार यादी वाचाल तरच राजकारणात टिकाल; अन्यथा शंभर टक्के घरी बसाल!” – आमदार किशोर आप्पा पाटील

April 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page