• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 8, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा
वहिवाटी रस्त्याला विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल अन् सर्व शासकीय योजनेचा लाभ बंद, कुऱ्हाड खु. येथील प्रकरणात प्रशासनाची कारवाई

पाचोरा, 8 एप्रिल: पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील वहिवाटी रस्त्याच्या प्रकरणात प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. कोर्टाचा आदेश असतानाही रस्त्याचा ताबा देण्यास विरोध केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही बंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बापू पुंडलिक हटकर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय? –
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 नुसार रमेश जयराम महाजन यांनी दाखल केलेल्या मुळ दावा क्र. 04/2022 मध्ये दि. 28 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवत अर्जदाराला वहिवाटी रस्त्याचा ताबा देण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दि. 27 मार्च 2026 रोजी मंडळ अधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच पोलीस पथक घटनास्थळी गेले होते. मात्र, समोरच्या पक्षातील बापू पुंडलिक हटकर यांनी रस्ता देण्यास विरोध करत अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सर्व शासकीय योजनांचा लाभही बंद –
महसूल व वन विभागाच्या 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, वहिवाटी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित व्यक्तीचे पीएम किसान योजना, आधारकार्ड व फार्मर आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात आले असून, सर्व शासकीय योजनांचा लाभही बंद करण्यात आला आहे.

तहसीलदारांचे शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन –
पारंपरिक वहिवाटी रस्त्यांवर अतिक्रमण करू नये, रस्ते नांगरून त्यावर पिकांची लागवड करू नये किंवा इतर शेतकऱ्यांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण करू नये. पुर्वापार चालत आलेल्या वहिवाट रस्त्यास तसेच नकाशावर असलेल्या रस्त्यावर कोणीही अतिक्रमण तसेच वापरास हरकत अडथळा करण्यात येऊ नये. अन्यथा शासन निर्णयानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पाचोरा येथील तहसीलदार विजय बनसोडे यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची बदली; करिश्मा नायर असतील नव्या CEO

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer road despitepachora newssuvarna khandesh livetahsil office pachoratahsildar vijay bansode

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page