मुंबई, 28 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीएसह 25 जणांना मिळालं तिकीट आहे. यापुर्वी भाजपच्यावतीने पहिल्या यादीत 99 जणांना तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तसेच आतापर्यंत भाजपकडून एकूण 146 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांना तिकीट –
भाजपच्या तिसऱ्या यादीत देवेंद्र फडणवीसांच्या पीएला म्हणजेच सुमित वानखेडे यांना आर्वी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांची सात वर्षांपूर्वी फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच ते सुमित वानखेडेंना मुंबईत घेऊन आले. वानखेडे मूळचे विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघातील असून 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अचानक त्यांचे नाव इच्छुक उमेदवारांच्या यादीत झळकले होते. जूनमध्ये लोकसभा प्रभारी झाल्यापासून वानखेडे हे झोकून देत पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना आता विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपच्या तिसऱ्या यादीत यांचा आहे समावेश –
- मुर्तिजापूर – हरीश पिंपळे
- कारंजा -सई डहाके
- तिवसा- राजेश वानखडे
- मोर्शी- उमेश यावलकर
- आर्वी-सुमित वानखेडे
- काटोल- चरणसिंग ठाकूर
- सावनेर – आशीष देशमुख
- नागपूर मध्य – प्रवीण दटके
- नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
- नागपूर उत्तर – मिलिंद माने
- साकोली – अविनाश ब्राह्मणकर
- चंद्रपूर – किशोर जोरगेवार
- आर्णी – राजू तोडसाम
- उमरखेड – किशन वानखेडे
- देगलूर- जितेश अंतापूरकर
- डहाणू – विनोद मेढा
- वसई – स्नेहा दुबे
- बोरीवली – संजय उपाध्याय
- वर्सोवा – भारती लव्हेकर
- घाटकोपर पूर्व – पराग शाह
- आष्टी – सुरेश धस
- लातूर – अर्चना पाटील चाकूरकर
- माळशिरस – राम सातपुते
- कराड उत्तर – मनोज घोरपडे
- पलूस -कडेगाव संग्राम देशमुख
हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाची तिसरी यादी जाहीर, ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी?