नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दरम्यान, आज मतमोजणी होऊन दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहेत. आताच्या क्षणाची मोठी बातमी समोर आली असून दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय तर भाजपची विजयच्या दिशेने आगेकूच केलीय. दरम्यान, आम आदमी पार्टीवर पिछाडीवर पडल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीतून दिल्लीतील विधानसभेच्या 70 जांगापैकी भाजप 47 तर आम आदमी पक्षाला 23 जागा मिळाल्या आहेत.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत 60.54 टक्के मतदान झाले होते. तर 2020 च्या तुलनेत यावेळी दिल्लीत 2 टक्के कमी मतदान झाले. दरम्यान, आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. यामध्ये आताच्या माहितीनुसार, 70 जांगापैकी भाजप 47 तर आम आदमी पक्षाला 23 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागेवर विजय मिळवता आलेला नाहीये.
अरविंद केजरीवाल यांचा पराभव –
दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालंय. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा पराभव केलाय. यासोबतच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांचा देखील पराभव झाल्याने आपला मोठा धक्का बसलाय. तर दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री आतिषी यांचा विजय झालाय.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत