धरणगाव (जळगाव), 22 मार्च : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच धरणगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला (ग्रामसेवक) लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली आहे. धरणगाव तालुक्यातील खर्दे (बु) येथील ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय 37) याने 25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदाराने केलेल्या गावहाळ तसेच गटारीच्या कामाच्या बिलातून सदर ग्रामसेवकाने 10 टक्के रक्कम लाच स्वरूपात मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे नितीन ब्राम्हणे हा ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत होता. दरम्यान, तक्रारदाराने खर्दे गावातील गावात गटारीचे 2 लाख रुपये व गावहाळ बांधण्याचे 70 हजार रूपयांचे अशी 2 लाख 70 हजार रुपयांचे काम केले होते. यानंतर ग्रामसेवक नितीन ब्राम्हणे याने तक्रारदाराचे दोन्ही कामाचे बिल काढुन दिले होते. सदर कामाचे 1 लाख 95 हजार रूपये व 69 हजार रूपये अशे 2 स्वतंत्र चेक दिले होते. सदर बिलाची एकूण रक्कम 2 लाख 64 हजार रूपये तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली होती.
ग्रामसेवकाने मागितली 25 हजार रूपयांची लाच –
यानंतर तक्रारदार यांचे कामाची बिले व सदर बिलांचे 2 चेक काढून दिले. या कामाचा मोबदला म्हणून ग्रामसेवक नितीन ब्राम्हणे यांने तक्रारदार यांना 2 कामाचे 2 लाख 70 हजार रुपयांचे बिल काढून दिले त्या कामाचे 10 टक्के प्रमाणे 27 हजार रूपये होतात. परंतु, तुम्ही जवळचे असल्याने 25 हजार रूपये द्यावे लागतील, तुम्ही सरपंचला देखील काही देत नाही, असे सांगून 25 हजार रुपयांच्या लाचेची स्पष्ट मागणी ग्रामसेवक नितीन ब्राम्हणे याने केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ –
दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव एसबीकडे आज शनिवार 22 मार्च रोजी तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सापळा रचत खर्दे (बु) येथील ग्रामसेवक नितीन ब्राम्हणे यास 25 हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीस न्यायालयास हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई –
सदर कारवाई ही जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागेच पोलीस अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील(चालक), पोलीस नाईक किशोर महाजन, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सुर्यवंशी आदींनी केली.
हेही वाचा : Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची संवेदनशीलता; मुक्या जीवांसाठी तत्परता, नेमकी बातमी काय?