• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Breaking : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळाले पहिले पदक, नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 28, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळाले पहिले पदक, नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास

पॅरिस, 28 जुलै : पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलेच कांस्यपदक मिळाले आहे. भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.

मनू भाकरने कांस्य पदक पटकावले –
पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय विविध खेळांच्या स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. तसेच कालपासून या ऑलिम्पिकच्या स्पर्धेस सुरूवात झालीय. दरम्यान, आज भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक पटकावले आहे. मनू भाकरने पटकावलेले कांस्य पदक हे या ऑलिम्पिकमधले पहिलेच पदक आहे.

नेमबाज मनू भाकरने रचला इतिहास –
मनू भाकरने नेमबाजीतील एकूण ऑलिम्पिक पदकासाठी तब्बल 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली. 2012 मध्ये लंडनच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने शेवटच्या वेळी पदक जिंकले होते. यानंतर नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. मनू भाकर ही 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पदक जिंकू शकली नव्हती.

कोण आहे मनू भाकर? –
टोकियो ऑलिम्पिकनंतर मी खूप निराश झाले होते आणि त्यावर मात करायला मला खूप वेळ लागला. खरंतर, आज पदक मिळवल्यानंतर मला काय वाटतंय, हे शब्दात सांगू शकत नाही. दरम्यान, कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितलं होत आणि तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होते, अशा भावना मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर व्यक्त केल्या आहेत. मनू भाकरने भगवद्गीता वाचली होती आणि त्यातून प्रेरणा घेऊन ती पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्याचेही तिने सांगितले. दरम्यान, मनू भाकर ही 22 वर्षांची असून ती मूळची हरियाणा राज्यातील झज्जर तालुक्यातील आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे.

राष्ट्रपती-पंतप्रधान यांनी केलं अभिनंदन –
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर राष्ट्रपती-पंतप्रधान यांनी तिचे अभिनंदन केले आहे. 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याने मनू भाकरचे हार्दिक अभिनंदन. मनू भाकर नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरलीय. भारताला तुझ्यावर अभिमान आहे, असे द्रौपदी मुर्मु म्हणाल्या. तर नरेंद्र मोदी म्हणाले की, एक ऐतिहासिक पदक. मनू भाकरने भारतासाठी पहिले पदक जिंकून अप्रतिम कामगिरी केलीय. कांस्य पदक जिंकणाऱ्या मनूचे खूप खूप अभिनंदन. शूटिंगमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू असल्याने तिचं हे यश खूप खास आहे. ती भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे.

हेही वाचा : वयाच्या बाराव्या वर्षी RSS मध्ये त्यानंतर पाच वेळा आमदार अन् आता थेट राजस्थानचे राज्यपाल; जाणून घ्या, हरिभाऊ बागळेंचा प्रवास

बातमी शेअर करा !
Share
Tags: Bronze Medalmanu bhakermanu bhaker wins bronze medalparis olympics 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

mla-kishor-appa-patil-special-post-for-his-wife-sunita-tai-patil-on-their-marriage-anniversary

‘मी स्वतःला खरंच खूप…’; लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार किशोर आप्पा पाटील यांची सुनिताताईंसाठी खास पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

May 14, 2025
Jalgaon News : डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा नेमका काय सल्ला?

Jalgaon News : डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा नेमका काय सल्ला?

May 14, 2025
BSF Jawan : चुकून पाकिस्तानात गेले अन् अखेर 22 दिवसांनी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ भारतात परतले

BSF Jawan : चुकून पाकिस्तानात गेले अन् अखेर 22 दिवसांनी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ भारतात परतले

May 14, 2025
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! इयत्ता 12 वीच्या गुणपत्रिकांचे ‘या’ तारखेपासून होणार वाटप

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! इयत्ता 12 वीच्या गुणपत्रिकांचे ‘या’ तारखेपासून होणार वाटप

May 14, 2025
‘महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार!’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

‘महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार!’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

May 14, 2025
Chopda News : वडती येथील पुज्य साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 100 टक्के

Chopda News : वडती येथील पुज्य साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 100 टक्के

May 14, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page