ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 26 मार्च : व्यक्तिगत लाभांच्या योजना या सर्व गोरगरिबांच्या योजना आहेत. अशिक्षित लोकांच्या योजना आहेत. दरम्यान, पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने गोरगरिबांसाठी असलेल्या व्यक्तिगत लाभांच्या विविध योजनेची माहिती व मदत गावागावात जाऊन शिबिराद्वारे देण्यात येणार आहे.
काय आहे संपुर्ण बातमी –
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती नसल्याने त्याच्या उपयोग करता येत नाही. त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा-भडगाव मतदारसंघातील गावागावांमध्ये विविध योजनांच्या माहितीसाठी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयामध्ये माहिती व मदत आलेल्या नागरिकांना करण्यात येणार आहे.
रेशनकार्ड तयार करण्यासाठी लागणारी मदत तसेच पंचायत समितीमध्ये विविध योजनांची माहितीसाठी मदत, बाल संगोपन, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, नवीन मतदान कार्ड दुरुस्ती करणे, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजनांसाठी माहिती व मदत करण्यात येणार आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या शिबिराला पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधून सुरुवात करण्यात आली, दरम्यान, या शिबिरात बंडू सोनार, प्रताप हटकर, शुभम बागुल, राजेश जमदाडे, संदीप पाटील, आशा सेविका वैशालीताई यांनी काम पाहिले. दरम्यान, सदरील योजनांसंदर्भातील माहिती व मदत घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्याला संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.
हेही वाचा : पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी!, आमदार किशोर आप्पा पाटलांनी घेतला ऐतिहासिक निर्णय