जळगांव – जळगाव जिल्ह्यातील तब्बल 11 ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. जळगांव जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांना विनंती केली होती.
त्यानुसार भारतीय कापूस महामंडळ मार्फत शेंदुर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जळगांव, धरणगांव, एरंडोल व पारोळा अशा एकूण 11 ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
मुक्ताईनगरमध्येही लवकरच खरेदी केंद्र सुरू होणार –
भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जळगांव जिल्ह्यांतर्गत प्रत्येक तालुक्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे मागणी केली होती. परंतु काही त्रांत्रिक अडचणींमुळे काही तालुक्यावर सुरू करता येणार नाही. तर मुक्ताईनगर येथे लवकरच खरेदी केंद्र सुरू करणार असल्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय कडून कळविण्यात आले आहे. तसेच 11 केंद्रावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड; औरंगाबाद (पीक वर्ष 2024-25), 11 केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची यादी –
- पाचोरा (भडगाव) – अनंतकुमार पुंडकर, सी.ओ.
- चाळीसगाव – मयांक कुमार, जे.सी.ई.
- जळगाव – कमलप्रसाद मीना, एस. सी.ओ.
- शेंदुर्णी – नेलम दत्ता, जे.सी.ई.
- जामनेर – प्रवीण पाटील, एस. सी.ओ.
- बोदवड – तमोनश रॉय, जे.सी.ई.
- भुसावळ – प्रद्यानंद चौधरी, जे.सी.ई
- धरणगाव – योगेश थाळनेरकर, सी.ओ.
- चोपडा – दिपंकर रॉय, जे.सी.ई
- एरंडोल – सायन जाना, जे.सी.ई
- पारोळा – इंद्रप्रकाश लता, सी.ओ.
गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; वाचा, सविस्तर बातमी…