ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 जानेवारी : जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार आज 19 जानेवारी रोजी पाचोरा नगरपरिषदेत स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या सदस्य नामनिर्देशन व सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन व महिला-बालकल्याण अशा सहा विषय समित्यांची रचना पूर्ण करण्यात आली.
पाचोरा नगरपरिषदेत सहा विषय समित्यांची घोषणा –
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी प्रियंका वाल्मिक पाटील यांची निवड करण्यात आली असून, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी प्रविण हरिश्चंद्र ब्राम्हणे, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सतीष पुंडलिक चेडे यांची निवड झाली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती म्हणून रहेमान बिस्मिल्ला तडवी, तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी किशोर गुणवंत बारवकर यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मिनाक्षी संजय एरंडे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
स्थायी समितीतीत ‘या’ तिघांची निवड –
तसेच स्थायी समितीत नगराध्यक्षा, सर्व विषय समित्यांचे सभापती व नगरपरिषद सदस्यांमधून नामनिर्देशित तीन सदस्य म्हणून गणेश भीमराव पाटील, संजय नाथालाल गोहिल व राहुल अंकुश गायकवाड यांची निवड करण्यात आली. या विशेष सभेचे कामकाज पिठासीन अधिकारी भुषण अहिरे, उपविभागीय अधिकारी (पाचोरा विभाग) यांनी पाहिले. सभेला लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील, उपाध्यक्ष किशोर गुणवंत बारवकर, सर्व नगरपरिषद सदस्य व सदस्या, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(1) सार्वजनिक बांधकाम समिती
(1) प्रियंका वाल्मिक पाटील (सभापती)
(2) सुमित किशोर पाटील
(3) संदीप रामदास पाटील
(4) रफिक गफ्फार बागवान
(5) प्रांजल सुमित सावंत
(6) जयश्री अमृतराव भोसले
(7) सुरज संजय वाघ
(2) शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती
(1) प्रविण हरिश्चंद्र ब्राम्हणे (सभापती)
(2) प्रदीप भगवान वाघ
(3) खनसा सलीम बागवान
(4) योगेश जगन्नाथ पाटील
(5) संजय त्र्यंबक चौधरी
(6) दिपाली किशोर पाटील
(7) अमरीन अ. रेहमान देशमुख
(3) स्वच्छता, वैद्यक आणि सार्व.आरोग्य समिती
(1) सतीष पुंडलिक चेडे (सभापती)
(2) संदीप रामदास पाटील
(3) मनिषा सुचेंद्र बाविस्कर
(4) जयश्री अमृतराव भोसले
(5) प्रदीप भगवान वाघ
(6) वर्षा प्रविण ब्राम्हणे
(7)गोपालदास लक्ष्मणदास वासवानी
(4) पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती
(1) रहेमान बिस्मिल्ला तडवी (सभापती)
(2) प्रांजल सुमित सावंत
(3) सुमित किशोर पाटील
(4) सुरेखा अशोक पाटील
(5) संजय त्र्यंबक चौधरी
(6) खनसा सलीम बागवान
(7) कविता उमेश हटकर
(5) नियोजन अणि विकास समिती
(1) किशोर गुणवंत बारवकर (सभापती)
(2) शरद बाळकृष्ण पाटे
(3) रफिक गफ्फार बागवान
(4) रशिदाबी शब्बीर शेख
(5) वैशाली छोटूलाल चौधरी
(6) वर्षा प्रविण ब्राम्हणे
(7) अविनाश देविदास सुतार
(6) महिला व बालकल्याण समिती
(1) मिनाक्षी संजय एरंडे (सभापती)
(2) मनिषा सुचेंद्र बाविस्कर
(3) दिपाली किशोर पाटील
(4) सुरेखा अशोक पाटील
(5) वैशाली छोटूलाल चौधरी
(6) रशिदाबी शब्बीर शेख
(7) कविता विनोद पाटील
हेही वाचा : मोठी बातमी! राज्यातील 29 महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत तारीख ठरली






