चाळीसगाव, 2 नोव्हेंबर : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली. दरम्यान, राज्य सरकारद्वारे दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये चाळीसगाव तालुक्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता पाठपुरावा –
राज्यभरात यावर्षी ठिकठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा पाठपुरावा आमदार मंगेश चव्हाण यांनी सरकारकडे केला होता. दरम्यान, राज्य सरकारद्वारे चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आलेला आहे. याआधी सर्व चाळीसगाव तालुका पीकविमा मदतीसाठी पात्र ठरला आहे.
चाळीसगाव तालुक्याला मिळणार ‘या’ सवलती –
- जमीन महसुलात सूट.
- पीक कर्जाचे पुनर्गठन.
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती.
- कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5% सूट.
- शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
- रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर.
- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाचे तोडणी खंडित न करणे.