आबू रोड (राजस्थान) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशसिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी रतनमोहिनीजी यांचे 8 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी 1.20 मिनिटांनी अहमदाबाद येथील जायडस हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार उद्या दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ब्रह्माकुमारीज् शांतीवन येथे करण्यात येतील.
ब्रह्माकुमारी रतनमोहिनीदादी गेल्या दोन दिवसांपासून श्वासाच्या अडचणीमुळे अस्वस्थ्य होत्या. त्यांना तातडीने अहमदाबाद येथील जायडस हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकिय टीमने शर्थीचे प्रयत्न केले तथापि, त्यांनी प्राणत्याग केले.
दिघार्यु दादी रतन मोहिनीजी –
राजयोगाच्या नियमित साधक असलेल्या ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या प्रमुख पदी असलेल्या दादींचे वय 101 वर्षे होते. शेवटपर्यंत त्यांची प्रकृती स्वस्थ्य होती. अनुशासन आणि संयमीत जीवन जगलेल्या दादीजींनी देश-विदेशातील लाखों व्यक्तिंच्या जीवनात मूल्यसंस्कार रुजविलेत, जगातील सर्वांत मोठ्या आध्यात्मिक संस्थेचे नेतृत्व करीत असूनही हसतमुखाने आणि मधुरवाणीने त्यांनी लाखों राजयोगी परिवारांना कुटुंबप्रमुखाचे प्रेम दिले.
उद्या पार पडणार अंत्यसंस्कार –
ज्या भूमीत त्यांनी देशविदेशातील व्यक्तिंना जीवनाची दिशा दाखविली अशा आबूरोड येथील पवित्र शांतीवन येथे त्यांचे अंत्यसंस्कार 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता होणार आहेत. तत्पूर्वी 8 एप्रिल रोजी शांतीवन येथील सभागृहात त्यांच्या पार्थीवाचे दर्शन घेता येईल. 9 एप्रिल रोजी ब्रह्माकुमारीजचे सर्व प्रमुख वास्तु पांडव भवन येथील बाबांचा कमरा, शांती स्तंभ, बाबा कुटीया, हिस्ट्री हॉल या आध्यात्मिक चार धाम येथे दर्शनार्थ नेण्यात येईल तसेच ओमशांती भवन, ज्ञानसरोवर, पीसपार्क येथून परत शांतीवन येथील कॉन्फ्रेन्स हॉल येथे अंतिम दर्शनार्थ ठेवण्यात येईल.
देश-विदेशातून शोक संवेदना –
दादी रत्नमोहिनी यांचे आध्यात्मिक प्रभामंडळाने देश विदेशातील प्रत्येक देशात आध्यात्मिक साधक वर्ग होता. त्याचप्रमाणे राजकिय, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवर शोक संवेदना व्यक्त करीत आहेत.