• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

VIDEO | रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापला; मंत्री म्हणाले की, “केंद्राकडून निधीत प्राप्त होताच…!”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 26, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, व्हिडीओ
VIDEO | रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापला; मंत्री म्हणाले की, “केंद्राकडून निधीत प्राप्त होताच…!”

मुंबई, 26 फेब्रुवारी: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या मजुरीचा मुद्दा मनोज कायंदे, धर्मरावबाबा आत्राम, बबनराव लोणीकर, प्रशांत बंब तसेच नितीन राऊत यांनी उपस्थित केला. यावेळी सभागृहात वातावरण तापल्याचे दिसून आले. दरम्यान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) निधी उपलब्धतेसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असून निधी प्राप्त होताच तात्काळ रोजगार हमी योजनेचे पैसे मजुरांना वितरित करण्यात येईल, अशी माहिती रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

रोहयो मंत्री भरत गोगावले काय म्हणाले? –

राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या थकीत मजुरीबाबत आमदार मनोज कायंदे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना रोहयो मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले की, रोजगार हमी योजना पूर्वीप्रमाणेच सुरू असून, मजुरांना नियमांनुसार मजुरी दिली जात आहे. कोणत्याही मजुराला कमी करण्यात येणार नाही. रोजगार हमी योजनेचा ‘जी रामजी’ योजनेत रूपांतर करण्यात येत असले तरी त्याचा मजुरांच्या उपस्थितीवर किंवा मजुरीवर कोणताही परिणाम होणार नाही. योजना पूर्ववत सुरू राहील आणि मागणीनुसार काम दिले जाईल.

आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निधी देण्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. जर तक्रार आली तर चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. ज्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे, त्यांचे सर्व पैसे नियमांनुसार दिले जातील; कोणावरही अन्याय होणार नाही, असेही रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

 

हेही वाचा: उत्तर महाराष्ट्राच्या जलद कनेक्टिव्हिटीसाठी 105 किलोमीटर लांबीचा खान्देश एक्सप्रेसवेचा डीपीआर प्रक्रियेत

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: budget session 2026mgnregaminister bharat gogawalesuvarna khandesh livevidhansabha

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    “शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

    “शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

    July 15, 2026
    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

    July 15, 2026
    शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

    शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

    July 15, 2026
    VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

    VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

    July 15, 2026
    ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    July 15, 2026
    Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

    Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

    July 14, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page