मुंबई, 24 जानेवारी : राज्यामध्ये 2015-16 ते 2019-20 या कालावधी दरम्यान, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आला होता. राज्यातील विकास प्रक्रिया आणि त्यातील टप्पे जाणून घेता यावेत आणि ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा मेळ ताळमेळ आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा, आणि समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत, याकरीता हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यानंतर आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2023 जाहीर करण्यात आला आहे.
फेलोंच्या निवडी संबंधातील निकष –
1. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
2. शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60 टक्के गुण आवश्यक), उच्चतम शैक्षणिक अहर्तेस प्राधान्य दिले जाईल.
3. अनुभव – किमान 1 वर्ष पूर्णवेळा कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून इंटर्नशिप/अप्रेंटीसशिप/आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
4. भाषा आणि संगणक ज्ञान – मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
5. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय अर्ज सादर करायवयाच्या अंतिम तारखेस किमान 21 वर्ष आणि कमाल 26 वर्ष असावे.
6. अर्ज करायवयाची पद्धत – अर्थ आणि सांख्यिकी संचलनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन सिस्टिमद्वारे उमेदवाराने अर्ज करावा.
7. अर्जाकरता आकारण्यात येणारे शुल्क – 500 रुपये.
8. फेलोंची संख्या – या कार्यक्रमात फेलोंची संख्या ही 60 इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी महिला फेलोंची संख्या एकूण संख्येच्या 1/3 इतकी राहील. 1/3 महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोची निवड करण्यात येईल.
महाराष्ट्र शासनातर्फे #मुख्यमंत्री_फेलोशीप_कार्यक्रम-२०२३ जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी https://t.co/iuQvV3eZon पाहा…#CMF#ChiefMinisterFellowship#CMFP#CMFellow https://t.co/AfX5X7IQF0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 24, 2023
9. फेलोंचा दर्जा – शासकीय सेवेतील गट -अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.
10. फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी – फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रूजु झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.
11. विद्यावेतन – या कार्यक्रमात निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन 70 हजार रुपये आणि प्रवासरुपये म्हणून 5 हजार रुपये, असे एकत्र 75 हजार रुपये छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
राज्य सरकारच्या या मुख्यमंत्री फेलोशिप 2023 कार्यक्रमाला अर्ज करण्यासाठी लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.