• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात खान्देशचा पुन्हा डंका! चोपडा बसस्थानक राज्यात पहिलं, 50 लाखांचे बक्षीस जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 26, 2024
in महाराष्ट्र, चोपडा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
महाराष्ट्रात खान्देशचा पुन्हा डंका! चोपडा बसस्थानक राज्यात पहिलं, 50 लाखांचे बक्षीस जाहीर

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 26 जून : एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला आहे. दरम्यान, या बसस्थानकाला रू.50 लाख रूपयांचे बक्षीस मिळाले आहे.

तसेच अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून, या बसस्थानकाला रू.25 लाखाचे बक्षीस मिळाले आहे. तसेच ‘क’ वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून या बसस्थानकाला रू.10 लाखाचे बक्षीस मिळाले आहे.

“हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान –
मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 1 मे 2023 ते 30 एप्रिल,2024 या काळामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविले गेले. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बागबगीचा, वृक्षरोपण, प्रवाशांसाठी बसस्थानकांवर वॉटरकुलर, घड्याळ, सेल्फीपॉईंट, ही कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा-सुविधा, बसेसच्या स्वच्छते बरोबरच त्यांची तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनात दिलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारे बसस्थानकांची बक्षीसासाठी निवड करण्यात आली आहे.

‘अशी’ झाली निवड –
ही स्पर्धा राज्यभरातील 563 बसस्थानकांवर घेण्यात आली. या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी चढ-उताराच्या संख्येवरून अ, ब, क वर्गात वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या बसस्थानकाला राज्यस्तरावरील अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यातून सर्वाधिक गुण मिळवणारे बसस्थानक पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले.

15 ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार –
या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसे देण्यात येणार असून, येत्या 15 ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रदेशनिहाय बक्षीस पात्र बसस्थानकांची यादी सोबत जोडली आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व बक्षीस पात्र बसस्थानकांचे अभिनंदन केले आहे. या अभियानातून “आपलं गावं आपलं बसस्थानक, स्वच्छ सुंदर बसस्थानक” ही संकल्पना एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच स्थानिक रहिवाश्यांमध्ये रूजविण्यास मदत झाली आहे. असे प्रतिपादनही कुसेकर यांनी केले आहे.

हेही वाचा : लासगाव बरडी सोलर प्रकल्पावर जळगावचे कलेक्टर आयुष प्रसाद यांची विशेष मुलाखत. 

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda bus standsuvarna khandesh live updateswachh sundar bus station campaign

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
VIDEO | राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मुद्दा उपस्थित

VIDEO | राज्यात पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याकडून मुद्दा उपस्थित

March 5, 2026
हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

हंगाम 2025-26 मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा

March 4, 2026
Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

Breaking! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ चार जणांना मिळाली उमेदवारी

March 4, 2026
युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page