मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 25 फेब्रुवारी : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांचा कार्यक्रम अंतर्गत महाआवास अभियान गुहस्तोव 2024/25 अंतर्गत बालेवाडी पुणे येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षखाली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी 20 लाख घरकुल यांची मंजुरी व प्रथम हप्ता वितरित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर चोपड्यात माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते 80 घरकुल लाभार्थी मंजुरी पत्र देण्यात आले.
लता सोनवणे यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना पत्र –
चोपडा शासकीय विश्राम गृह येथे चोपडा विधानसभा मतदार संघातील आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा मार्गदर्शने खाली माजी आमदार लता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. जळगांव जिल्हात सर्वाधिक घरकुल हे चोपडा तालुक्यात मंजूर करण्यात आली. दरम्यान, माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते 80 घरकुल लाभार्थी मंजुरी पत्र देण्यात आले.
यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तसेच उपस्थित चोपडा पंचायत समिती गटविकास अधिकारी वानखेडे. सहाय्यक गटविकास अधिकारी विसावे. विस्तार अधिकारी जे पी पाटील, इंजि. किरण निनायदे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिवराज पाटील, किरण देवराज, माजी उपनगरध्यक्ष विकास पाटील, माजी नगरसेवक संध्याताई महाजन तसेच स्वाती बडगुजर, महेंद्र धनगर. ए के गंभीर, कैलास बाविस्कर, मंगल इंगळे, कुणाल पाटील, गणेश पाटील आदी पदाधिकारी व अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र सोनवणे तर आभार गटविकास अधिकारी वानखेडे यांनी मानले.