नगाव (धुळे), 3 फेब्रवारी : गेल्या आठवड्यात संपूर्ण उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. याचा पार्श्वभूमीवर गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे,74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नगाव गावात स्वच्छता अभियान राबवले.
या मोहिमे अंतर्गत विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गावकऱ्यांना आरोग्य व स्वच्छतेचा निकटचा संबंध आहे. परिसराची स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, हे समजावून सांगितले. विद्यार्थिनींनी महिलांना घराच्या व परिसराच्या अस्वच्छतेमुळे डासांची निर्मिती होते व आजार होतात. त्यासाठी घर आणि परिसर स्वच्छ ठेवला तर गावाचे आरोग्य चांगले राहील, हेसुद्धा पटवून सांगितले. तसेच गावात विविध ठिकाणी साफसफाईचा उपक्रम राबवला.
सदर कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल नगाव एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी बाळासाहेब मनोहर भदाणे, उपाध्यक्षा आणि नगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच माईसाहेब ज्ञानज्योती मनोहर भदाणे, चेअरमन राम दादा भदाणे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, उपप्राचार्य प्रा. जि. एम. पोद्दार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
हेही वाचा – 74 वा प्रजासत्ताक दिवस, धुळ्यातील नगाव येथे उत्साहात साजरा; पाहा VIDEO
या कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन संपूर्णपणे पाटील वाल्मीक, पाटील प्रथमेश, प्रणव पाटील, सूर्यवंशी पुष्पराज, भोंगे सोहम, राकेश पाटील, माळी हेमराज, कु. राजपूत स्नेहा, पाटील दिव्या, बेहेरे शिवानी, सोनवणे रुचिका, जोशी साक्षी या विद्यार्थ्यांनी केले. तर या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. गोकुळ एन्डाईत, प्रा. उमेश पगारे, प्रा. अशपाक अन्सारी, प्रा. अनुप पुरकर, प्रा. कु. कृत्तिका पाटील, प्रा. कु. रेणुका धात्रक यांनी केले.