धुळे, 26 जानेवारी : आज सर्वत्र 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धुळे जिल्ह्यातील नगाव येथेही 74 वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
नगांव एज्युकेशन सोसायटी संचलित गंगामाई प्राथमिक विद्यामंदिर नगांव येथे प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण गावाच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती (माईसाहेब) मनोहर भदाणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक बांधव तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक याठिकाणी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायतही सादर केली. याप्रकारे याठिकाण 74वा व्या प्रजासत्ताक दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यासोबतच नगाव येथील अण्णासाहेब द. वा. पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय नगांव याठिकाणीही 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करुन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एनसीसी संचालन करून तिरंगा ध्वजाला सलामी दिली. यासोबतच याठिकाणी कवायत कार्यक्रमही संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगांव ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती (माईसाहेब) मनोहर भदाणे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भदाणे, जिल्हा परिषद सदस्य रामदादा मनोहर भदाणे तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील जेष्ठ नागरिकही उपस्थित होते.