• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

VIDEO | ‘डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा!’, फसवणुकीचा संशय आल्यास नेमकं करावं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली प्रक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 25, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, व्हिडीओ
VIDEO |  ‘डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा!’, फसवणुकीचा संशय आल्यास नेमकं करावं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली प्रक्रिया

मुंबई, 24 फेब्रुवारी: कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. अशा प्रकारचा कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो फसवणूक असल्याने डिजिटल ॲरेस्टचा फोन आल्यास नागरिकांनी तत्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. अशा प्रकरणात जनजागृतीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या वेळी सांगितले.

राज्यात, विशेषतः मुंबई आणि अहिल्यानगर शहरांमध्ये “डिजिटल अरेस्ट” आणि ऑनलाईन फसवणुकीद्वारे होत असलेल्या लूट प्रकरणांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अलीकडे काही फसवे लोक स्वत:ला पोलीस अधिकारी, कस्टम अधिकारी म्हणून ओळखवतात आणि नागरिकांना सांगतात की त्यांच्या नावावर आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडले आहेत. त्यानंतर ते नागरिकांना सांगतात की त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले आहे आणि स्क्रीनसमोरून हलू नये. त्यानंतर ते लोकांना घाबरवून मोठी रक्कम  ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडतात. या प्रकरणांत सामान्य नागरिकांसह उच्चपदस्थ निवृत्त अधिकारीही फसले आहेत. एका निवृत्त आयएएस अधिकारी आणि नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सुद्धा भीतीपोटी पैसे गमावले आहेत. या फसवणुकीचे जाळे विदेशातून चालवले जाते, तर भारतातील लोक फक्त ‘हँडलर’ म्हणून काम करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

राज्यात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी व्यापक यंत्रणा उभारण्यात आली असून, जर कोणी चुकीने पैसे ट्रान्सफर केले असतील आणि तत्काळ १९३० वर कळविले, तर बँकांच्या समन्वयातून त्या रकमा गोठविणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य आणि केंद्र शासनाकडून याबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. टीव्ही जाहिराती, रिंगटोन आणि विविध माध्यमांतून ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीबाबत सतत सूचना दिल्या जात आहेत. तरीही दररोज कोणी ना कोणी या जाळ्यात अडकत आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत जागरूक रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधानसभा सदस्य अभिजित पाटील या प्रश्नाच्या चर्चेत सहभाग घेतला.

हेही वाचा:  VIDEO: अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: budget session 2026cm devendra fadnaviscyber crimedigital arrestmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम

April 11, 2026
महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

April 11, 2026
चाळीसगावच्या पिलखोडचे जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत ₹60 लाखांची मदत; पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

चाळीसगावच्या पिलखोडचे जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत ₹60 लाखांची मदत; पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

April 10, 2026
खरीप हंगाम 2026 नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक; शेतकऱ्यांना पुरेशा खत पुरवठ्याचा आढावा

खरीप हंगाम 2026 नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक; शेतकऱ्यांना पुरेशा खत पुरवठ्याचा आढावा

April 10, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

April 10, 2026
खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page