• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 14, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
VIDEO | मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, मृताच्या वारसांना मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, 14 फेब्रुवारी : मुंबईतील मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील RAJV (मिलन) परिसरात सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान पियर क्रमांक P196 जवळ आज दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा जगाची मृत्यू झाला असून इतर दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर घटनेची तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून मृताच्या वारसांना पाच लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील RAJV (मिलन) परिसरात सुरू मेट्रो मार्गाच्या बांधकाम सुरू आहे. या बांधकामादरम्यान पियर क्रमांक P196 जवळ दुपारी मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील. उंचावरून पॅरापेटचा एक भाग खाली पडून तो तेथून जात असलेल्या रिक्षावर आदळला या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रामधन यादव असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून राजकुमार इंद्रजीत यादव (वय ४५) हे आयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्याचबरोबर महेंद्र प्रताप यादव (वय ५२), दीपा रुहिया, (वय ४०) हे जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, मेट्रो प्रकल्पाची टीम घटनास्थळी उपस्थित होती तसेच मुंबई महापालिका प्रशासन, मुंबई अग्निशमन दल, मुंबई ट्रॅफिक पोलिस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या समन्वयाने मदतकार्य युद्धपातळीवर करण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा –

मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका –

माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, मेट्रो मार्गावरून तुकडे कोसळणे, असुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि उघड्या खड्ड्यांमध्ये कार-बाईक तासनतास अडकून राहणे, ही अत्यंत लाजिरवाणी व चिंताजनक बाब असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सध्याच्या भाजप सरकारच्या कारभारात नागरिकांच्या जीवितास कोणतीही किंमत उरलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, परिस्थिती अशीच राहिली तर लवकरच इतर देश आपल्या नागरिकांना भारतात प्रवास करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्याची वेळ येईल. दरम्यान,  सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल का? कदाचित नाही, असं देखील त्यांनी म्हटलं.

मुंबईत फिरायले आले अन् सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू –

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याचे सरपंच रामधनी यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मुंबईत मित्राच्या ऊसाच्या रसाच्या दुकानातून ते कळव्यातील नातेवाईकांच्या लग्नासाठी रिक्षाने निघाले होते. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास अचानक मेट्रोचा सिमेंट स्लॅब कोसळला. हा स्लॅब थेट त्यांच्या रिक्षावर पडल्याने गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत सरपंच रामधनी यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा : चोपडा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच्च्या केळ्यांपासून साकारलं 18 फूट उंच भव्य ‘महाशिवलिंग’

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavismarathi newsmulund incidentmulund metro slab collapsesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page