• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 14, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 14 एप्रिल : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादित केले.

वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमास व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिल सेलवन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील त्यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी राज्य शासन इंदू मिल येथे त्यांचे भव्य स्मारक साकारत आहे. त्यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. संविधानाच्या तत्त्वावर देशाचा कारभार सुरू आहे. या संविधानानेच देशाच्या महासत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे. बाबासाहेबांचा पुतळा हा संविधानशिवाय अपूर्ण असतो. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून शोषित, पीडित लोकांना न्याय देण्याचे काम केले. संविधानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली. संविधान निर्माण करताना त्यांची दूरदृष्टी आणि बुद्धीची प्रगल्भता लक्षात येते.

डॉ. बाबासाहेबांचा मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर पहिला सत्कार मुंबईत झाला. एवढेच नव्हे तर, केंद्रीय मंत्री, प्रांतिक अध्यक्ष, गोलमेज परिषदेवरून देशात परत आल्यावर, राज्यघटना पूर्ण करून परत आल्यानंतर अशा अविस्मरणीय क्षणी बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार मुंबईमध्येच झाला. बाबासाहेब यांनी वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चैत्यभूमीवर अभिवादन सभाही मुंबईतच पार पडल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनपटात त्यांना उजाळा देणारे, त्यांच्या स्मृती जागविणारे अनेक प्रसंग मुंबईने अनुभवले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि प्रिंटिंगही मुंबईतच झाले. त्यांच्या राजकीय आयुष्याचे अनुष्ठान हे मुंबईतूनच सुरू झाले. शोषितांचा आवाज बनवून ते आयुष्यभर लढले, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्रास्ताविक आमदार कोळंबकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हेही वाचा : मंत्री गुलाबराव पाटील आमदार रोहित पवारांवर भडकले, म्हणाले, “ते इंग्लिश मीडियमचं पोट्टं; त्याला जिल्हा परिषद….”

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisDr. Babasaheb Ambedkarmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कापूस पिकाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतीतज्ज्ञ सुनिल पाटील यांचं शेतकऱ्यांना महत्वाचं मार्गदर्शन

कापूस पिकाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतीतज्ज्ञ सुनिल पाटील यांचं शेतकऱ्यांना महत्वाचं मार्गदर्शन

August 5, 2025
मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील ‘या’ ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल नेमण्याच्या दिल्या सूचना

मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यातील ‘या’ ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल नेमण्याच्या दिल्या सूचना

August 5, 2025
Pachora News : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात ‘वृक्षदिंडी’ चे आयोजन

Pachora News : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात ‘वृक्षदिंडी’ चे आयोजन

August 5, 2025
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील 795 रुग्णांना 6 कोटी 99 लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील 795 रुग्णांना 6 कोटी 99 लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

August 4, 2025
महसूल सप्ताह 2025 : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राबविण्यात आला वृक्षारोपणाचा उपक्रम

महसूल सप्ताह 2025 : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राबविण्यात आला वृक्षारोपणाचा उपक्रम

August 4, 2025
Pachora News : पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

Pachora News : पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 3, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page