• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

धोकादायक कचरा प्रक्रियेसाठी गोव्यात सरकारचा मोठा टप्पा; पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत 125 कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 14, 2025
in ताज्या बातम्या, देश-विदेश
धोकादायक कचरा प्रक्रियेसाठी गोव्यात सरकारचा मोठा टप्पा; पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत 125 कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

पणजी, 14 ऑगस्ट : सत्यकुमार मोहन संचेती एसएमएस ग्रुप्स, फोंडा एन्व्होकेअर लिमिटेड सामान्य धोकादायक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (CHWTSDF) गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन (GWMC) आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (GIM) यांच्या सहयोगाने सत्तरी, पिसुर्ले औद्योगिक वसाहत येथे उभारण्यात आलेल्या प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते गुरुवार दि. 14 ऑगस्ट रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमात मनोगत मांडताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, एसएमएस ग्रुपने पुढील 100 वर्षांसाठी सार्वजनिक, खाजगी भागीदारीतून 125 कोटींहून अधिक खर्च केला आहे. या निधीचा वापर धोकादायक कचरा प्रक्रिया करण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व कंपन्यांनी त्यांचा धोकादायक कचरा फक्त ‘पीईएल’ला द्यावा आणि कचरा प्रक्रिया करण्याचा इतर कोणताही मार्ग स्वीकारला जाणार नाही तसेच अनावश्यक प्रक्रिया केल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अर्थात यावर गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन त्यावर लक्ष ठेवणार आहे.

हे काम नक्कीच यशस्वी होणार असून शरद काळे सारखे तज्ज्ञ यात सहभागी असल्याने या प्रक्रियेत प्लांट लगत रहाणाऱ्या लोकांवर कोणताही विपरित परिणाम होणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. कचऱ्याची विल्हेवाट ही गोव्यात आता समस्या राहिलेली नाही. सरकारी पातळीवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून कचऱ्यातून राज्याची सुटका करण्यासाठी सरकारचे सतत प्रयत्न सुरू असतात. पिसुर्ले ग्रामपंचायतीच्या स्थानिकांनी उपस्थित केलेल्या चिंता आणि समस्या सोडवण्यासाठी मी वचनबद्ध असून स्थानिकांना या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे.

गोवा राज्यसरकार भारत सरकारसोबत कचरा व्यवस्थापनाबाबत ज्ञान भागीदारी करत आहे. गोव्यातील आमचे घनकचरा व्यवस्थापन या कचऱ्याचे संपत्ती आणि स्वच्छ उर्जेमध्ये रूपांतर करत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्येच्या आमदार देविया राणे, माजी खासदार राज्यसभा अजय संचेती, कचरा व्यवस्थापन विभागाचे सचिव महेश कुमार शंभू, गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक हरीश आडकोणकर, पद्मश्री डॉ. शरद काळे, विज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाचे संचालक डॉ. स्नेहा गित्ते, पीईएल अध्यक्षल परम संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : Police Bharti Update : महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर, नेमक्या जागा किती?

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm dr pramod sawantgoa latest marathi newspisurle industrial estatesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 20, 2025
रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वपूर्ण मागणी

रावेर लोकसभा क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वपूर्ण मागणी

December 20, 2025
बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक – सचिव तुकाराम मुंढे

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक – सचिव तुकाराम मुंढे

December 20, 2025
राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात; उद्या निकाल

राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात; उद्या निकाल

December 20, 2025
देशभक्तीपूर्ण वातावरणात 64 वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

देशभक्तीपूर्ण वातावरणात 64 वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

December 20, 2025
जळगाव जि.प. सीईओ मिनल करनवाल यांची संवेदनशीलता; तब्बल ७ वर्षांनंतर पीडित महिलेला न्याय, नेमकं प्रकरण काय?

जळगाव जि.प. सीईओ मिनल करनवाल यांची संवेदनशीलता; तब्बल ७ वर्षांनंतर पीडित महिलेला न्याय, नेमकं प्रकरण काय?

December 19, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page