जळगाव, 12 ऑगस्ट : महायुती सरकारच्यावतीने राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या पार्श्वभूमीवर उद्या जळगावातील सागर पार्कवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाभार्थ्यांसोबत संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम उद्या दुपारी 3 वाजता पार पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्याचे असे आहे नियोजन –
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार 13 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे :-
- मंगळवार उद्या 13 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने सागर पर्क जळगावकडे प्रयाण
- दुपारी 3.00 वाजता ते सायं 5.00 वाजेपर्यंत महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमासाठी सागर पार्क, जळगाव येथे आगमन.
- सागर पार्क, जळगाव येथून सायं. 5.15 वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण
- सायं 5.30 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण
- सायं 6.30 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण
- सायं 7.वाजता वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव
पालकमंत्र्यांनी केली सभास्थळाची पाहणी –
संपूर्ण राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी एस टी प्रवासात सवलत आणि आता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, यामुळे महिलांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यासर्व योजनाच्या बाबतीत बहिणींशी सुसंवाद करण्यासाठी सागर पार्कवर होणार असलेल्या कार्यक्रमाची तयारी सुरु असून त्याची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडून उद्या 13 ऑगस्ट रोजी सागर पार्कवर आयोजित केलेल्या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यांची असेल उपस्थिती –
जळगावातील सागर पार्कवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी 3 वाजता सागर पार्कवर होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत