जळगाव, 7 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून हवामान सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होतं आहे. दरम्यान, उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेमुळे राज्यात पारा घसरलाय. राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये किमान तापमान हे 9 ते 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येणार आहे.
काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या पाच दिवसात कोरड्या हवामान राहणार असून काही भागात ढगाळ हवामान राहणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढत असून किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, असे असले तरी पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यात काल किमान तापमानात वाढ झाली तर रात्री आणि सकाळी थंडी वाढली होती.
जळगावाचे हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळतोय. कधी कडाक्याची थंडी तर कधी कडाक्याचे ऊन पडतंय. दरम्यान, आज सकाळपासून जळगाव जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे तर काही भागात कडाक्याची थंडी आहे. तसेच जळगाव जिल्ह्याचे पुढील तीन कडाक्याची थंडी पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जळगावचे पुढील तीन दिवसांचे तापमान हे खालीलप्रमाणे असणार आहे.
- 7 जानेवारी – कमाल तापमान – 7 अंश
- 8 जानेवारी – कमाल तापमान – 8 अंश
- 9 जानेवारी – कमाल तापमान – 9 अंश
हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview