ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 सप्टेंबर : पाचोरा-भडगाव तालुक्यातील वादळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाला असून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवदेन तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना दिले आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत
काँग्रेसने दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन –
लगतच्या तालुक्यातील शेतकरींना त्यांच्या आमदार यांना प्रयत्न करुन लाखो रुपयांचे दुष्काळाचे अनुदान प्राप्त झाले आणि पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे तोंडाचे पाणी पुसले गेले. सद्याची परीस्थितीत पावसाचे अती प्रमाण झाल्याने शेतकऱ्यांचे पिक कापणीवर आले असतांना अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाउन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार यांना देण्यात यावे. यासाठी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश –
तालुका काँग्रेसने दिलेल्या या निवेदनात शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल देण्यात यावा, जेणेकरून तात्काळ ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी पाचोरा-भडगाव तहसीलदार यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सचिव इरफान मनियार, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, एस. सी. सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, युवक माजी अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष शंकर सोनवणे, फरीद शेख, शेख रशीद, संदीप वाघ आदी उपस्थित होते.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview