मुंबई, 6 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात प्रचारसभांचे आयोजन करण्यात आहे. अशातच आज काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून नागपूर आणि मुंबईत त्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा घोषणा होण्याची देखील शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर –
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून आज 6 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. राहुल गांधी नागपुरात दुपारी 1 वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. यानंतर संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार आहे. दरम्यान, या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत.
विदर्भातून प्रचाराला करणार सुरुवात –
काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपूरमधून प्रचाराला सुरुवात करणार आहे. खरंतर, काँग्रेससाठी विदर्भाला मोठे महत्त्व आहे. भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये थेट लढत असलेल्या 76 मतदारसंघांपैकी 36 मतदारसंघ विदर्भातील आहेत. राज्यातील सर्व विभागांमध्ये भाजप विदर्भात सर्वाधिक 47 जागा सर्वाधिक जागा लढत आहे. दरम्यान, काँग्रेसला विदर्भात अपेक्षित असे यश मिळाल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी राहुल गांधीच्या प्रचाराची सुरुवात महत्वाची मानली जात आहे.
मुंबईत स्वाभीमान सभेचे आयोजन –
नागुरातील सभा झाल्यानंतर राहुल गांधी हे मुंबईत येणार आहेत. यानंतर संध्याकाळी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार मुंबईत “स्वाभिमान सभेला” संबोधित करतील. यावेळी महाविकास आघाडी यावेळी हमीपत्र जाहीर करु शकते. शेतकरी कर्जमाफी आणि जातीयगणना या प्रमुख हमी यात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता देखील आहे.
हेही वाचा : Video : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, पिंपळगाव हरे. येथील जनतेशी थेट संवाद…