चोपडा, 30 ऑगस्ट : चोपडा येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला जल्लोषात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) व चोपडा शहर सामाजिक सांस्कृतिक समितीतर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे एकविस हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यात एकूण अकरा संघाने भाग घेतला होता.
दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा –
जमिनीपासून 21 फुट उंचीवरील ही दहीहंडी अरुण नगर येथील न्यू एकता मित्र मंडळाने चार मनोरे उभे करून पवन सुनील पाटील याने मोठ्या उत्साहात जोशपूर्ण हवेत उंच उडी मारून ही दहीहंडी फोडली. त्यावेळी हजारो प्रेक्षकांनी आनंद व्यक्त करीत जल्लोष साजरा केला. यावेळी विजेत्या संघाला माजी आमंदार जगदीश वळवी, मा आमदार कैलास बापू पाटील, मा जिप सदस्य सुनील पाटील (वाळकीकर), जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सनी सचदेव, परेश देशमुख, गिरीश देशमुख, तुकाराम पाटील, रमाकांत पाटील, रोहित निकम, रवींद्र नाना पाटील, वलय पाटील, मिलिंद सोनवणे पत्रकार, शुभम सोनवणे, स्वाती बडगुजर, भटु पाटील, जितेंद्र शिंपी यांच्या हस्ते बक्षीस व चेक देण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांचा सन्मान –
समितीच्या वतीने राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले. चोपडा येथील बसस्थानकाचा महाराष्ट्रात स्वच्छ व सुंदर बसस्थानक म्हणून प्रथम क्रमांक आला म्हणून व पोलीस खात्यातील सिंघम म्हणून ओळख असलेले विलेश सोनवणे यांचा ही सन्मान करून गौरविण्यात आले.
35 वर्षापासून दहीहंडीचे आयोजन –
सुनील पाटील (वाळकीकर) यांच्या संकल्पनेतुन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधीचौकात गेल्या 35 वर्षापासून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतोय. यावेळी मधुकर साळवे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक जितेंद्र वालटे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
हेही वाचा : “मी, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो”, पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?