• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Ajit Dada Pawar : अखेर ‘महाराष्ट्राचा दादा’ अनंतात विलीन; अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 29, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
Ajit Dada Pawar : अखेर ‘महाराष्ट्राचा दादा’ अनंतात विलीन; अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल

बारामती, 29 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवीपणे निधन झाल्याने संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी या त्यांच्या मूळगावी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर, बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शोकाकूल वातावरणात साश्रू नयनांनी अजित दादांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ‘अजित दादा अमर रहे…अमर रहे, अजित दादा परत या…परत या’ अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री तसेच राजकीय, सामाजिक, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

बारामतीतीत अजित दादा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार –

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाल्याचे वृत कळताच बारामतीसह राज्यात शोकाकूल वातावरण निर्माण झाले. अजित पवार यांचे पार्थिव काल बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालायत ठेवण्यात आले होते. याप्रसंगी पवार कुटुंबीय तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर, कार्यकर्त्यांना अजित दादांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात रात्री उशिराने काही वेळेसाठी नेण्यात आले होते.

अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटला आहे. दरम्यान, आज सकाळी बारामती तालुक्यातील काटेवाडी या त्यांच्या मूळगावी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव नेण्यात आले. यानंतर, विद्या प्रतिष्ठानाच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवाला शासकीय मानवंदना देत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारामतीत पोलिसांचा मोठा फौजफाटा –

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्ययात्रेपूर्वी आता वाहतुकीत देखील बदलत करण्यात आल्याचे दिसून आले. अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दल याठिकाणी तैनात करण्यात आले आणि याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा असल्याचे दिसून आले.

‘महाराष्ट्राचा दादा हरपला’ –

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल 28 जानेवारी रोजी बारामतीत अजित पवार यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी ते नेहमीप्रमाणे आज सकाळी लवकर मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामतीत विमान लँडिंग करत असताना अचानक भीषण अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह आणखी पाच जण प्रवास करत होते. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, ‘महाराष्ट्राचा दादा’ हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

अपघात झालेल्या विमानात कोण-कोण होतं? –

  1. अजित दादा पवार
  2. विदीप जाधव (अजित पवार यांचे खासगी सुरक्षारक्षक, मुंबई)
  3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
  4. कॅप्टन संभवी पाठक
  5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावूक पोस्ट

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawarajit pawar funeralajit pawar funeral baramatibaramati newsmarathi newssuvarna khandesh livevidya pratishthan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे ‘या’ तीन मोठ्या खात्यांची असणार जबाबदारी

January 31, 2026
Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Breaking! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड; आज सायंकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी परिस्थितीची केली पाहणी अन् तात्काळ पंचनाम्याचे आदेश

January 31, 2026
अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित दादांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

January 31, 2026
sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

sharad pawar press : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माहिती नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य

January 31, 2026
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

January 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page