मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. यावेळी त्यांचा 61 वा वाढदिवस हा राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवासेनेतर्फे करण्यात येईल, अशी माहिती युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली. गुरुवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
61 सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 61 वा वाढदिवस येत्या 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील 36 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवासेनेतर्फे करण्यात येईल. या 61 सन्मानमूर्तीमध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, असंघटित कामगार, विद्यार्थी इत्यादी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
कॉमन मॅन निर्माण केली ओळख –
एकनाथ शिंदे हे जून 2022 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अडीच वर्ष ते मुख्यमंत्रीपदी कायम राहिले. या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपली प्रतिमा ही कॉमन म्हणून तयार केली. सर्वसामान्य माणसालाही त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना, महिला सन्मान योजना यामाध्यमातून त्यांची लोकप्रियता वाढली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हे तर कॉमन मॅन असे कायम सांगितले.
दरम्यान, आता त्यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील 36 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवासेनेतर्फे करण्यात येईल.
हेही वाचा – दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस