डोंबिवली (ठाणे),19 मे : मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. यामध्ये महिलांना 1500 रूपये प्रति महिना देण्यात येतो. दरम्यान, कमी कालवाधीतच ही योजना लोकप्रिय बनली. परिणामी, नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहिण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रूपये करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, सरकार येऊन सहा महिने उलटले असतानाही लाडकी बहिणी योजनेत निधीत वाढ करण्यात आलेली नाहीये. यावरून मागील काही महिन्यांपासून विरोधकांकडून लाडकी बहिणी योजनेवरून सरकारवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावर पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत स्पष्ठ शब्दात प्रत्युत्तर देत ही योजना अजिबात बंद केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. डोंबिवलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
View this post on Instagram
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी देखील लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आमच्या गाडीचे देखील इंजिन तेच आहे. डबल इंजिनचे सरकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आमच्या पाठीशी असून आम्ही जे-जे बोलले ते टप्प्याटप्प्याने आम्ही करणार, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, आमचे सरकार प्रिटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नसून दिलेला शब्द पाळणार आमचं हे सरकार असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय.
2100 रूपये देण्याचे देण्याचे आश्वासन –
महायुती सरकारच्या काळात लोकप्रिय असलेली लाडकी बहिण योजना राज्यभरात गाजली. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहिण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रूपये करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, आता सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांचा कालवधी उलटला असतानाही लाडकी बहिण योजनेची रक्कमेत वाढ करण्यात आलेली नाहीये. यामुळे सातत्याने विरोधकांकडून सरकारवर आरोप केले जातात.