मुंबई, 9 जानेवारी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दीप कमल फाउंडेशनतर्फे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त अटल महाकुंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुंबईतील रंगशारदा येथे झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘अटल सन्मान‘ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“दरवर्षाप्रमाणे दीप कमल फाउंडेशनतर्फे श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रंगशारदा येथे यावर्षीही उपस्थित राहण्याचे सौभाग्य ‘अटल महाकुंभ‘ या कार्यक्रमात लाभले. पण यावेळी एक मोठी जबाबदारी या संस्थेने मला प्रदान केली म्हणजे ‘अटल सन्मान‘ हा पुरस्कार ! जड अंतःकरणाने मी तो स्वीकारला आणि त्यातून प्रेरणा घेत अधिक चांगले काम करण्याचा निर्धार केला, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दरवर्षप्रमाणे दीप कमल फाउंडेशनतर्फे श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रंगशारदा येथे यावर्षीही उपस्थित राहण्याचे सौभाग्य ‘अटल महाकुंभ‘ या कार्यक्रमात लाभले.
पण यावेळी एक मोठी जवाबदारी या संस्थेने मला प्रदान केली म्हणजे ‘अटल सन्मान‘ हा पुरस्कार ! pic.twitter.com/jBD1ElpyBp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 8, 2023
अटलजींनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखविली. त्यांच्या मार्गावर चालून देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू या, असे विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – पाचोऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला, काय आहे कारण?
दरम्यान, याप्रसंगी ‘अटल गीतगंगा‘ या कार्यक्रमात व्हायोलीन वादक सुनीता भुयान यांनी वादन आणि कवितेचे गायन केले. तर लेखक,गायक हरीश भीमानी यांनीही ‘आज सिंधू ज्वार उठा..‘ ही कविता सादर केली. यावेळी आमदार सर्वश्री भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रसाद लाड, कालिदासजी कोळंबकर, तमीळ सेलवन, भाजपा नेते संजय पांडे, आयोजक अमरजीत मिश्र उपस्थित होते.